ओझे l विलास ढाकणे Oze
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना महालॅबच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेतील तपासण्या आणि रक्तनमुना संकलन सेवा बंद झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. संबंधित एचएलएल कंपनीची शासनाकडील मागील दोन वर्षांपासूनची देयके प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दिंडोरी तालुक्यातील एकूण 10 प्राथमिक आरोग्य केंद्र असून नाशिक जिल्ह्यात एकूण 112 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ह्या सर्व केंद्रावर रक्त लघवी तपासणी व इतरही तपासण्या बंद झाल्या आहेत.
पूर्वी महालॅबच्या माध्यमातून . या तपासण्या होत असत परंतु शासनाकडे त्यांचे देयके मागील दोन वर्षापासूनचे न मिळाल्याने त्यानी ती सेवा बंद केली आहे ही सेवा बंद पडल्याचा परिणाम या संपूर्ण व्यवस्थेवर झाला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे ही उपचारांची पहिली पायरी असतात. येथे रक्तनमुने संकलित करून विविध तपासण्यांसाठी पाठविण्याची सुविधा महालॅबमार्फत उपलब्ध होती.
ही सेवा बंद झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा अधिक फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दिंडोरी तसेच इतर सर्वच ग्रामीण तालुक्यातीलं प्राथमिक उपचार केंद्रावर सर्व सामान्य गोर गरीब मजूर वर्ग अवलंबून आहे पण आता त्यांना जास्त पैसे देऊन खाजगी लॅब चा आधार घ्यावा लागत आहे आणि प्रत्येक ठिकाणी खाजगी लॅब उपलब्ध नाही परत खर्च करून शहरिभागाकडे जावा लागत आहे त्यामुळे वेळ वाया जाऊन रुग्ण सेवेवर परिणाम होताना दिसत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवलर यावर योग्य असा तोदगा काढून रुग्णांचे हाल होणार नाही ही प्राथमिकता दर्शवावी अशी विनंती प्राथमिक आरोग्य केंद्र मधीलं सेवक तसेच डॉक्टर व ग्रामस्थांनी केली आहे.




