Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर; कुणाला काय मिळालं?

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर; कुणाला काय मिळालं?

मुंबई | Mumbai

महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे.

- Advertisement -

आतापर्यंतचा इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.७० टक्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

शिक्षण विभागाचा ३३७० कोटींचा अर्थसंकल्प

शिक्षण विभागाचा ३ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. या अर्थसंकल्पात मैदानांचा विकास, क्रिडा संकुल तयार करणे यासाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे.

विशेष तरतुदी

रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प – ८९७३.८७ कोटी

घन कचरा व्यवस्थापन – ४९८२.८३ कोटी

आरोग्य – ६९३३.७५ कोटी

पर्जन्य जलवाहिन्या – २१३२.७६ कोटी

प्राथमिक शिक्षण – ३३७०.२४ कोटी

इतर तरतुदी

कोस्टल रोडसाठी ३२०० कोटी

गोरेगाव मुलुंड लिंक रोड १३०० कोटी

सुरक्षित शाळा २२०० कोटी

पुलांच्या नवीन कामांसाठी – १५७६.६६ कोटी

पर्जन्य जल वाहिन्या आणि मिठी नदीचे पुनरुज्जीवन, पूर नियंत्रण – ५६५.३६ कोटी

दहिसर, पोयसर, ओशिवरा, वाळभट नद्यांचे पुनरुज्जीवन – १५३९.७९ कोटी

आरोग्य पायाभूत सुविधांसाठी – २६६६०.५६ कोटी

सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेसाठी – १४६०.३१ कोटी

कचरा व्यवस्थापनचे मोठे प्रकल्प – १६७.८७ कोटी

उद्यानांची प्रगती पथावरील कामे – १४७.३६ कोटी

वीर जिजाबाई भोसले उद्याने व प्राणी संग्रहालय – ११५.४६ कोटी

मुंबई अग्निशन दल – ३६५.५४ कोटी

महानगर पालिकेच्या मंड्यांसाठी – १२१.७२ कोटी

इमारत परिरक्षण खात्यासाठी ४२९.६४ कोटी

पशुवैद्यकीय आरोग्य खाते व देवाण पशुवध गृहसाठी – ३८.३८ कोटी

आपत्कालीन व्यवस्थापन – ३.७१ कोटी

कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा – २०० कोटी

पाणीपुरवठा नवीन प्रकल्प २०० कोटी

मध्य वैतरणा जलाशय येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प – १०.३० कोटी

जलवाहन बोगदे – ४६७ कोटी

जलाशयांची दुरुस्ती – ७१ कोटी

जलवितरण सुधारणा कामे – ६२३.१२ कोटी

मलनिःस्सारण प्रचालन जुन्या वाहिन्या बदलणे – १९५.४२ कोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या