Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Election : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी;...

BMC Election : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर केली नियुक्ती

मुंबई | Mumbai

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election Result) निकालानंतर प्रत्येक पक्षांकडून आपला महापौर बसविण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्याआधी भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांच्यासह छोट्या पक्षांकडून गटस्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यापूर्वी पक्षाचा महापालिकेतील गटनेता निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. अशातच आता मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेता निवडण्यात आला आहे.

- Advertisement -

ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९९ मधून पेडणेकर निवडून आल्या असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला. ठाकरेंच्या सेनेकडून महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे गटनेते पदासाठी चर्चेत होती. मात्र, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

YouTube video player

हे देखील वाचा : Maharashtra Political News : शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपाने तब्बल २५ वर्षानंतर ठाकरेंची सत्ता खालसा केली. महापालिकेत ८९ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागांवर विजय मिळाल्याने त्यांना दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले. तसेच शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक आणि समाजवादी पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला.

एसटी प्रवर्गातील नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर

मुंबईतील महापौरपदाचे आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीने झाल्यास महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नगरसेवक आरक्षण पद्धत जशी नव्याने काढण्यात आली होती तसेच महापौर आरक्षणही नव्याने काढले जाणार आहे. त्यामुळे ती चक्राकार आरक्षण पद्धतीची सुरूवात समजली जाणार असल्याचे सांगितले जाते. ठाकरे सेनेकडेच एसटी प्रवर्गातील नगरसेवक असल्याने सत्ताधारी पक्षांकडून या दोन नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांची पक्षाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

हे देखील वाचा : Political News : सर्वोच्च न्यायालयात आज ३० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी; काय निर्णय होणार?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाचा पंचनामा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेला अंमली पदार्थ (ड्रग्ज) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शामसुंदर विश्वनाथ गुजर याने अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील जप्त मुद्देमाल...