येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील तांदूळवाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.
- Advertisement -
तुषार राजेंद्र शिंदे (वय २३) हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून घरी परतलेला नव्हता. दुर्दैवानं घराशेजारील विहिरीत त्यांचा मृतदेह बुधवारी, (दि. ४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.




