Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : बोगस कंपन्याद्वारे हजारो कोटींचा घोटाळा

Ahilyanagar : बोगस कंपन्याद्वारे हजारो कोटींचा घोटाळा

श्रीगोंद्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे नगरमध्ये धरणे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी, बीकॉम अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरिब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावे या मागणीसाठी श्रीगोंद्यातील गुंतवणूकदारांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केले.

- Advertisement -

जिल्ह्यात काही तालुक्यात काही कंपन्यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केली असून त्या रकमेचा वापर संचालक व एजंटांनी स्वत:च्या मौजमेजेसाठी केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राज्याबाहेरही असल्याचे दिसून आले आहे. या कंपन्यांनी हवालामार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवली आहे. तसेच गुंतवणूकदारांची व शासनाची दिशाभूल करून गुंतणुकीतील रक्कम डॉलरमध्ये रुपांतरित केलेली ही रक्कम परत मिळण्यासाठी आणि या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

YouTube video player

श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरले असून त्यांच्या गुंतवणुकीसह व्याज परत मिळावे, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील राजेंद्र आबा म्हस्के, एस. आर. साके, अंबादास दरेकर, माऊली मोटे, महादेव म्हस्के, मोहन पवार, मुकुंद सोनटक्के, नितीन बोराडे, विनय दरेकर, प्रवीण धुमाळ, अनिकेत धुमाळ यांच्यासह फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकरणातील कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापन करणारे अधिकारी, एजंट यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी. तसेच या प्रकरणात आरोपींना पाठबळ देणार्‍यांनाही सहआरोपी करून कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

ताज्या बातम्या

Crime News : कर्जत तालुक्यातील शिंदे येथे तरुणाची निर्घृण हत्या

0
कर्जत |प्रतिनिधी| Karjat तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे (वय 35) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली...