Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन देशातील सर्वात विश्वसनीय ब्रँड

अमिताभ बच्चन देशातील सर्वात विश्वसनीय ब्रँड

नवी दिल्ली

बॉलीवूडचा बादशाहा म्हणून ओळख असणारे अमिताभ बच्चन वयाच्या 78 वर्षी लोकप्रिय आहेत. अजूनही चित्रपट, वाहिन्यांवरुन त्यांचे काम सुरु आहे.

- Advertisement -

चित्रपट व समाजासाठी योगदान दिल्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देशातील सर्वात विश्वसनीय व सम्मानित ब्रँड झाले आहे. 23 शहरातील 60 हजार लोकांच्या केलेल्या पाहणीचा अहवाल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन ब्रांड्स (IIHB)ने जाहीर केले आहे. या अहवालात अमिताभ बच्चन 88.0 चा TIARA स्कोर घेऊन सर्वात विश्वसनीय व्यक्ती ठरले आहे. म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यावर लोकांचा सर्वात जास्त विश्वास आहे.

दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार आहेत. त्यांनी 86.8 स्कोर मिळाला आहे. अनेक वादामुळे चर्चेत राहिलेल्या दीपिका पादुकोण 82.8 स्कोरने सर्वात विश्वसनीय महिला सेलिब्रिटी आहे.

कपिल शर्मा व महेंद्र सिंह धोनी टॉप पर

टिव्हीच्या गटात कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात आघाडीवर आहे. त्यांचा स्कोर 63.2 आहे. महिला टिव्ही सेलिब्रिटीजमध्ये कॉमेडियन भारती सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. क्रीडामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी 86.0 स्कोर घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा व स्मृती मानुधने आहेत.

हे आहेत कंट्रोवर्शियल सेलिब्रिटी

सर्वात कंट्रोवर्शियल सेलिब्रिटी क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आहे. त्यानंतर कलाकारात सलमान खान (Salman Khan) व कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचा क्रमांक आहे. सर्वाधिक कंट्रोवर्शियल टीवी सेलिब्रिटीमध्ये करण जौहर व मलाइका अरोडा आहे. सर्वात कंट्रोवर्शियल कपल रणबीर कपूर व आलिया भट्ट आहे. स्पोर्ट्समध्ये कंट्रोवर्शियल सेलिब्रिटी विराट कोहली व सानिया मिर्जा आहे.

23 शहरातील 60 हजार लोकांच्या केलेल्या पाहणीचा अहवाल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन ब्रांड्स (IIHB)ने जाहीर केले आहे. या पाहणीत देशातील 180 सेलिब्रेटीचा समावेश होता. त्यात बॉलीवूडचे 69 सेलेब्स तर टिव्हीचे 67 सेलिब्रिटी होते. क्रीडामधील 37 व अन्य क्षेत्रातील 7 सेलिब्रिटी होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....