Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजहॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा; पुण्यातील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने...

हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा; पुण्यातील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याचा कॉल

पुणे | Pune
पुणे शहरातील ५ स्टार हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉल आल्यानंतर पोलिसांची झोप उडाली. शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची कॉल आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. टेबल रिकामे करा, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय असा फोन हॉटेलच्या लँडलाईनवर आल्याने एकच धावपळ उडाली होती. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी केल्यावर हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी एका मोबाईल नंबरवरून पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असलेल्या पंच तारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईन फोनवर दुपारी १२.३० वाजे दरम्यान कॉल आला. मोबाईलवरुन संबंधित व्यक्तीने “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा” अशी धमकी देण्यात आली होती. हॉटेल व्यवस्थपकांनी त्वरीत हॉटेल खाली केले. पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी मात्र पोलिसांना बॉम्ब मिळाला नाही. त्यानंतर हॉटेलवर आलेला कॉल हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झाले. हा खोडसाळ प्रकार कोणी केला आणि का? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, हॉटेल व्यवस्थापनाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी, पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सिक्युरीटी मॅनेजर यांनी फिर्याद दिलीय. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

कोंडी

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २४ तासांपासून वाहतूक कोंडी;...

0
मुंबई | Mumbaiमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी घाटात टँकर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे.. जवळपास २४ तास झाले...