नगाव शिवारातील घटना
धुळे –
शहरातील देवपूर पश्चिम हद्दीत असलेले नगावबारी परिसरातील गट नंबर चारशे ऑब्लिक एक येथे एका शेतात शेतमालक राजेंद्र चिंतामण पाटील राहणार सुदर्शन कॉलनी यांच्या शेतात प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर छोटू भामरे यांचे MECB साहित्य शेतामध्ये ठेवले असता रात्री अचानक तीन वाजेच्या सुमारास मध्यरात्री काही चोरांनी सदर जागेवर हस्तक्षेप करत, तेथील दहा चोरांनी येथील 5 शेत मजूर जागल्या मुक्कामी राहणाऱ्या चौकीदार यांना बांधून ठेवले व पंधरा ते सोळा बंडल चार चाकी गाडी टाकून घेऊन गेल्याचे सदर घटना समोर आली.
याबाबत देवपूर पश्चिम येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, डीवायएसपी सचिन हिरे एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, देवपूर पश्चिम सतीश गोराडे, एपीआय मैनोद्दिन सय्यद, तसेच श्वान पथकाचे एम.आर.काजी, आर.जे.जाधव तसेच वीरू श्वान, पथक व फिंगरप्रिंट पथक या ठिकाणी उपस्थित होते.