Tuesday, March 25, 2025
Homeजळगावचाळीसगाव बंद घरातून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

चाळीसगाव बंद घरातून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरातील हिरापूर रोडस्थित एकाच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून, आत ठेवलेले ९६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. याप्रकरणी चाळीसगव पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हिलाल अन्ना पाटील रा.गणेशपूर, ह.मु.हिरापूर रोड, चाळीसगाव हे दि.१५ रोजी बाहेर गेले असता, अवघ्या तासाभरात त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोंडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले ९६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पोबरा केला.

याबाबत चाळीसगाव पोलीसात हिलाल अन्ना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....