Sunday, May 19, 2024
Homeजळगावयावल : तीन रूग्णांचा करोना अहवाल आला पॉझिटीव्ह ; ग्रामीण भागातही झाला...

यावल : तीन रूग्णांचा करोना अहवाल आला पॉझिटीव्ह ; ग्रामीण भागातही झाला शिरकाव

यावल – प्रतिनिधी
यावल शहरातील सार्वजनिक वाचनालय परिसरातील एका महिलेवर जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मधे औषध उपचार सुरू होते आणि आहेत.

या महिलेचा आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी 2 वाजता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला असल्याने सार्वजनिक वाचनालय परिसर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.

- Advertisement -

यामुळे सार्वजनिक वाचनालय परिसर, गवत बाजाराजवळ, वाणी गल्ली परिसर, पंचवटी परिसर, आणि देशमुख वाडा परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे, यामुळे संपूर्ण यावल शहरात पुन्हा एक मोठी धोक्याची घंटा वाजली आहे.

यासोबत यावल शहरातील खाटीक वाड्यातील एक जण आणि सातोद येथील एक व्यक्ती चा समावेश आहे. याप्रकारे यावल येथील 2 आणि सातोद येथील 1 असे आज एकूण तीन जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या