Friday, September 11, 2026
Homeनगरलाच प्रकरणात देशपांडेंना जामीन

लाच प्रकरणात देशपांडेंना जामीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांना उच्च न्यायलयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांनाही यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगरच्या जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. लाचेचा सापळा यशस्वी झालेला नाही. या प्रकरणात कोणतीही रिकव्हरी नाही. त्यामुळे अटकेची गरज नसल्याचा युक्तीवाद देशपांडे यांच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन अर्जावर पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...