राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला सर्वाधिक 5200 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 2097 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3900 रुपये ते 5200 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 2400 रुपये ते 3850 रुपये. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये. गोल्टी कांद्याला (Onion) 1500 रुपये 3800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 800 ते 1500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाची 1759 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 185 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सिताफळाच्या 124 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 5 ते 85 रुपये व सरासरी 45 रुपये किलोला भाव मिळाला. संत्री ची 36 क्रेट्सची आवक झाली. संत्री ला प्रति किलोला 3 ते 27 रुपये, सरासरी 15 रुपये किलो भाव मिळाला. पेरूची 3 क्रेट्सची आवक झाली. पेरूला सरासरी 70 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटच्या (Dragon Fruit) 22 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) 45 ते 78 रुपये तर सरासरी 60 रुपये भाव मिळाला.
गव्हाची 2 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 3375 रुपये भाव प्रतीक्विंटलला मिळाला. सोयाबीनची (Soybean) 65 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybean) 6900 रुपये ते 7020 रुपये भाव मिळाला तर सरासरी 7000 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




