Saturday, April 26, 2025
Homeक्राईमलाच घेताना भूमी अभिलेखचा निमतानदार चतुर्भुज

लाच घेताना भूमी अभिलेखचा निमतानदार चतुर्भुज

मोजणी अहवाल देण्यासाठी शेतकर्‍याकडे मागितले 10 हजार

अहमदनगर |पाथर्डी |प्रतिनिधी | Ahmednagar

शेतकर्‍याकडून 10 हजाराची लाच घेताना पाथर्डी येथील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कर्यालयातील निमतानदाराला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संजय भिमराव मनवरे (वय 56 रा. भगवाननगर, पाथर्डी) असे पकडलेल्या निमतानदाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील शेतकर्‍याच्या शेत जमिनीच्या झालेल्या मोजणीचा अहवाल व नकाशा न्यायालयात सादर करण्याकरिता संजय मनवरे याने लाच मागणी केल्याची तक्रार शेतकर्‍याने नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

- Advertisement -

सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने 18 सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी केली असता संजय मनवरे याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष 25 ते 30 हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता 10 हजार रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, लाचलुचपत विभागाने 3 ऑक्टोबर रोजी सापळा लावून संजय मनवरे याला तक्रारदारांकडून 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, उमेश मोरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...