Sunday, May 19, 2024
Homeधुळेशिंदखेडा पं.स.चा लाचखोर कनिष्ठ सहाय्यक अटकेत

शिंदखेडा पं.स.चा लाचखोर कनिष्ठ सहाय्यक अटकेत

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

अंतीम वेतन प्रमाणपत्रासाठी ग्रामविकास अधिकार्‍याकडे (Village Development Officer) आठ हजारांच्या लाचेची मागणी (demand for bribe) करून तडजोडीअंती सहा हजार रूपये घेणार्‍या शिंदखेडा पंचायत समितीच्या (Shindkheda Panchayat Samiti) लाचखोर कनिष्ठ सहाय्यकाला (bribe junior assistant) धुळे एसीबीच्या (Dhule ACB team) पथकाने रंगेहात (Caught red-handed) पडले. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शिंदखेडा पंचायत समितीतंर्गत वाघाडी खुर्द येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याची पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारी या पदावर शिरपूर पंचायत समिती येथे बदली झाली. त्यांना दि.18 एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आपले अंतीम वेतन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी शिंदखेडा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे याची वेळोवेळी भेट घेत होते.

त्यासाठी किरण मोरे याने त्यांच्याकडे 8 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे ग्रामविकास अधिकार्‍याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीद्वारे तक्रार केली. तसेच त्यांना गटविकास अधिकारी देवरे यांनी अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलविले असून त्यांच्याशी सदर विषयावर चर्चा करुन अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती माहिती तक्रारदाराने एसीबीला दिली.

एसीबीच्या पथकाने शिंदखेडा येथे जावून तक्रारदाराची भेट घेवुन तक्रार नोंदवून घेतली. दि. 18 जुलै रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांनी तक्रारदाराकडे अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी देवरे यांच्यासाठी चार हजार रुपये व स्वतःसाठी दोन हजार रुपये अशी एकूण तडजोडी अंती सहा हजार रुपयांची मागणी केली.

ही रक्कम धुळे येथे द्यावी असेही त्यांनी सांगितले होते. किरण मोरेंनी तक्रारदाराला आज सकाळी 8.45 वाजता देवपुरच्या दत्तमंदिर चौकात प्रमाणपत्र घेण्यासाठी बोलविले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सहा हजाराची लाच स्वीकारताच किरण मोरेला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजीतसिंह चव्हाण, प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके,कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, संतोेष पावरा,भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, सुधिर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या