Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेश…त्यामुळे देवाने तुला तिथेच शिक्षा केली; बृजभूषण सिंह यांचा विनेश फोगाटवर आरोप

…त्यामुळे देवाने तुला तिथेच शिक्षा केली; बृजभूषण सिंह यांचा विनेश फोगाटवर आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हरियाणाची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने राजकीय आखाड्यात एन्ट्री केली आहे. काल विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरियाणा विधानसभेच्या पाश्वभूमीवर दोघांनी आता राजकारणात एंट्री केली असून विनेश फोगटला काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट जाहीर झाले आहे. विनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले.

- Advertisement -

भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी विनेशवर जोरदार हल्ला केला आहे. तू कुस्ती जिंकून गेली नाहीस, फसवणूक करून गेली होती, ज्युनियर खेळाडूंच्या हक्क मारुन गेली होती. त्यामुळे देवाने तुला तिथेच शिक्षा केली, असा हल्ला बृजभूषण सिंहने विनेशवर केला. पैलवानांनी सुरु केलेल्या विरोध प्रदर्शनाचा संदर्भ घेत बृजभूषण सिंह म्हणाले, या प्रकरणाची कथा दोन वर्षांपासून सुरु झाली होती. १८ जानेवारीपासून कट कारस्थान सुरु झाले होते. त्यावेळी मी म्हटले होते, हे राजकीय षडयंत्र आहे. त्यात काँग्रेस सहभागी आहे. त्यात दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांनीच या कटाची पटकथा लिहिली होती. हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते, हे आता दोन वर्षांनी समोर आले आहे.

बृजभूषण सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “मी मुलींचा गुन्हेगार नाही, मुलींचा गुन्हेगार जर कोणी असेल तर ते बजरंग आणि विनेश आहे. या नाटकाची स्क्रिप्ट लिहिणारे भूपेंद्र हुड्डा जबाबदार आहेत. यांच्यामुळे जवळपास पावणे दोन वर्ष कुस्ती क्षेत्रातील घडामोडी ठप्प होत्या”. कुस्तीपटू विनेशवर हल्लाबोल करताना बृजभूषण सिंह म्हणाले, “हे खरे नाहीये का की एशियन गेम्समध्ये विनेश ट्रायल शिवाय गेली होती, मी कुस्तीचे जाणकार आणि विनेशला विचारू इच्छितो की एक खेळाडू एका दिवसात दोन वजनी गटासाठी ट्रायल देऊ शकतो का? वजन केल्यावर पाच तास कुस्ती थांबवण्यात येऊ शकते का? तुम्ही नियमांबद्दल बोलता, मग एक खेळाडू एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या वजनी गटासाठी ट्रायल देतो यामुळे दुसऱ्या खेळाडूंचा हक्क मारला जात नाही का? पाच तास कुस्ती थांबवण्यात आली नव्हती का? रेल्वेच्या रेफरीनचा वापर झाला नाही का? तुम्ही कुस्ती जिंकून गेला नव्हता, तुम्ही चीटिंग करून गेला होता”.

भूपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधत ब्रिजभूषण यांनी ‘कुस्तीगीरांच्या आंदोलना’मागे हरियाणा काँग्रेसचे नेते असल्याचा आरोप केला. बृजभूषण सिंह पुढे म्हणाले, “हे काँग्रेसचे आंदोलन होते. या संपूर्ण आंदोलनात आमच्याविरोधात जे षड्यंत्र रचले गेले त्याचे नेतृत्व भूपेंद्र हुड्डा यांनी केले. मला हरियाणातील जनतेला सांगायचे आहे की भूपेंद्र हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, बजरंग “या विनेश, ते मुलींच्या सन्मानासाठी (निषेध करत) बसले नाहीत, त्यांच्यामुळे हरियाणाच्या मुलींना याला आम्ही जबाबदार नाही, भूपेंद्र हुडा आणि हे आंदोलक जबाबदार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या