Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशसीमारेषेजवळ १००-१५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, ७२ लॉन्च पॅडची उभारणी; भारताकडून चोख प्रत्युत्तराची...

सीमारेषेजवळ १००-१५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, ७२ लॉन्च पॅडची उभारणी; भारताकडून चोख प्रत्युत्तराची तयारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न बऱ्याच प्रमाणात कमी झाले परंतु धोका कित्येक पटीने वाढला आहे. कारण पाकिस्तानने जम्मु सीमेवर लॉन्च पॅड आणि टेरर कॅम्प पुन्हा एक्टिव्ह केले आहेत असा दावा काश्मीर फ्रंटियरचे आयजी अशोक यादव यांनी केला आहे.

भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि दहशतवादी तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पाकिस्ताने गुप्त पद्धतीने ७२ दहशवादी लॉन्च पॅडची उभारणी केली आहे. त्यापैकी बरेसचे जम्मू आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारतावर हल्ला करण्याची तयारी केल्याचे वृत्त समोर आले होते. यासाठी त्याने बांगलादेश येथे दहशतवादी तळ उभारल्याचे सांगितले गेले. या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सीमेपलीकडून होणार्‍या संभाव्य घुसखोरीवर करडी नजर ठेवली जात आहे.

- Advertisement -

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एलओसीवर ६९ लॉन्चिंग पॅड एक्टिव्ह आहेत. ज्याठिकाणी जवळपास १००-१२० दहशतवादी घुसखोरी करण्याची प्रतिक्षा करत आहेत. आमच्या इंटेलिजेंस युनिटने सर्व ६९ एक्टिव्ह लॉन्चिंग पॅडवर करडी नजर ठेवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशन सिंदूर अजूनही जारी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने फॉरवर्ड एरियात सुधारणा केली आहे. ऑपरेशनल आवश्यकतेसाठी नवीन तंत्रज्ञान खरेदी केले आहे. घुसखोरीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी बीएएसएफ लक्ष केंद्रीत करत आहे असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील हुमहामा येथे बीएसएफ फ्रंटियर हेडक्वार्टरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

YouTube video player

पाकिस्तानच्या सियालकोट आणि जफरवाल भागात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ १२ दहशतवादी लॉन्च पॅड्स पुन्हा सक्रिय झाले आहेत. उर्वरित ६० लॉन्च पॅड्स हे नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडील जम्मूजवळील भागात उभारण्यात आले आहेत. दहशतवाद्यांची संख्या सतत बदलत असली तरी ते सहसा दोन ते तीन जणांच्या गटात ठेवले जातात, असे विक्रम कुंवर यांनी सांगितले.

दरम्यान, BSF ने लष्करासोबत मिळून LOC वर चांगली पकड बनवली आहे. ज्यामुळे २०२५ मध्ये घुसखोरीच्या ४ प्रयत्नांमध्ये ८ दहशतवाद्यांना ठार केले. बीएसएफने देशातंर्गत भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसोबत मिळून २२ संयुक्त ऑपरेशन केले. ज्यात नॉर्थ काश्मीरात काही दहशतवाद्यांना मारले. आम्ही अनेकवेळा दहशतवादी हालचालींची माहिती लष्कराला दिली आहे. सध्या १५० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर गुलमर्ग बाउल आणि इतर संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, जेणेकरून पर्यटकांना टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा कुठलाही प्रयत्न वेळीच हाणून पाडता येईल असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...