Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबुलाती है, मगर जाने का नही; मुंबई पोलिसांचे मिम्स व्हायरल

बुलाती है, मगर जाने का नही; मुंबई पोलिसांचे मिम्स व्हायरल

मुंबई | प्रतिनिधी 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सर्वत्र जनजागृती केली जात आहे, मुंबईमध्ये सध्या वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य दिला जात आहे. असे असतानाच जनजागृतीमध्ये नेहमीच अनोखी शक्कल लढविणाऱ्या मुंबई पोलिसांचे काही मिम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या मिम्स पाहून नेटकरयांनी मुंबई पोलिसांच्या क्रियेटीव्हीटीला सलाम ठोकला आहे.

- Advertisement -

गर्दीत जाऊ नका, आरोग्य सांभाळा, खोकताना किंवा शिंकताना स्वच्छ रुमाल लावा. अशाप्रकारे जनजागृती केली जात आहे. आता  मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांच्या शेरोशायरीचा आधार घेतला आहे. यामध्ये ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ शेर चा वापर करत जनजागृती केली आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने ट्वीटमध्ये इंदोरी यांना मास्क बांधण्यात आला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “जो वायरस है वो फैलाने का नहीं, बुलाती है मगर जाने का नहीं’’. जो व्हायरस आहे त्याचा फैलाव करायचा नाही, बुलाती है मगर जाने का नही, असे म्हटले आहे. नुकतेच हे मिम्स दस्तूरखुद्द राहत इंदोरी यांनी रिट्वीट केला आहे.

मुंबई पोलीस अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी नानाविध संकल्पना राबवत असतात. यामध्ये नुकतेच सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याचा समाचार डेसिबल मीटर लाऊन घेतला होता. यानंतर मुंबईमध्ये सिंगल सुरु असताना विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण कमी झाले होते.

त्यानंतर या मिम्समुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस चर्चेत आले आहेत. सोशल मीडियात हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून मुंबई पोलिसांच्या क्रियेटीव्हिटीला सलाम अनेकांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या