Friday, April 25, 2025
Homeक्राईमटेम्पोतून औषधाचे बॉक्स चोरले, दिवसा घरही फोडले

टेम्पोतून औषधाचे बॉक्स चोरले, दिवसा घरही फोडले

तोफखाना हद्दीतील घटना || रोकड, सोन्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. टेम्पोतून सुमारे 50 हजाराचे औषधाचे बॉक्स चोरून नेले तर घरफोडी करून रोकड, दागिने व मौल्यवान वस्तू असा 35 हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

वेलू दुरास्वामी स्वामी (वय 40 रा. कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेलू हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करतात. 30 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील एका कंपनीमधून औषधांनी भरलेला माल घेऊन ते बंगलोरकडे जात होते. रात्री साडेसात वाजता ते कल्याण बायपासवरील समाधान हॉटेलजवळ थांबले होते. जेवण व आरामानंतर रात्री नऊ वाजता त्यांनी पुन्हा प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोवरील ताडपत्री फाटलेली दिसली आणि त्यामधील 5 बॉक्स चोरीला गेलेले होते. एकूण किंमत 49 हजार 635 रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

अमीन शमशुद्दीन शेख (वय 59, रा. भूतकरवाडी, महेश कॉलनी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी 1 डिसेंबर रोजी दुपारी पावणे तीन ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान शेख यांचे घर फोडले. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा खालचा भाग कट करून घरात प्रवेश केला आणि 13 हजारांची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंग आणि इतर मौल्यवान दागिने असा एकूण 35 हजारांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी तोफखाना पोलिसांनी भेट दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...