Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमभरदुपारी मुलीला चाकूचा धाक दाखवून घरातून रक्कम चोरली तर अन्य दोन ठिकाणी...

भरदुपारी मुलीला चाकूचा धाक दाखवून घरातून रक्कम चोरली तर अन्य दोन ठिकाणी घरफोड्या

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलीला चाकूचा धाक (Knife Fear) दाखवून तीन अनोळखी इसमांनी घरातील रोख रक्कम (Theft) लुटल्याची घटना नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे घडली. या घराजवळच असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी (Burglary) करुन एकूण 7 तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 59 हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेल्याची घटना 15 जानेवारी रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

याबाबत स्वप्नाली बाबासाहेब आरगडे (वय 17) या विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 15 जानेवारी रोजी मी सकाळी 7 वाजता शाळेमध्ये गेले होते व त्यांनतर 11 वाजेच्या सुमारास घरी आले. मी घरी आले त्यावेळी भाऊ बालाजी हा त्याचे शाळेत गेला होता तर काही वेळाने माझे आई-वडील हे आमचे शेतात निघून गेले. त्यानंतर मी एकटी घरी होते.दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मी एकटीच घरामध्ये असताना आमचे घरामध्ये अचानक तीन अनोळखी इसम (वय अंदाजे 25 ते 30 वर्षे) घरामध्ये आले. त्या तिन्ही इसमांच्या हातामध्ये चाकू होते. त्यातील एका इसमाने चाकू (Knife) दाखवून मला गप्प बसण्यास सांगून इतर दोन इसमांनी आमचे घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून कपाटात रोख रक्कम घेवून मला घरातील सोन्याबाबत विचारपुस करु लागले.

आमचेकडे सोने नसल्याचे सांगितल्यावर ते तीन्ही इसम घराच्या बाहेर निघुन घराला बाहेरून कुलूप लावले. त्यांतनर मी माझा चुलत भाऊ अक्षय बापुसाहेब आरगडे यास फोन करून चोरीची माहिती दिली. त्याने मोठमोठ्याने आरडा ओरड केले नंतर त्यांचे समोरुन तीन इसम मोटार सायकलवरून पळुन गेले. भावाने आमचे घरी येवुन आमचे घराची बाहेरुन कडी उघडली व आई-वडीलाना फोन करुन माहीती दिली. सदर इसमांनी घरातील 35 हजार रुपये रोख रक्कम चोरुन (Theft) नेली. त्यानतंर आरडा ओरड झालेने आमचे शेजारी राहणारे अशोक मुरलीधर आरगडे यांचे बंद घराचे कुलूप तोडुन त्याच इसमांनी चोरी करून त्यांच्या घरातील 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम 4 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. तसेच बाळासाहेब रामनाथ चामुटे यांचेही बंद घराचे कुलूप तोडुन 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 20 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली असलेचे मला समजले आहे. त्यानंतर पोलिसांना माहीती दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस व ठसेतज्ज्ञांनी भेट दिली.

मी आमचे घरामध्ये एकटीच असतांना 3 अनोळखी इसमांनी घरामध्ये घुसून मला चाकुचा धाक दाखवुन आमचे कपाटामध्ये ठेवलेले 35 हजार रुपये रोख रक्कम तरोच आमचे शेजारी राहणारे अशोक ऑरगडे यांचे घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने व 4 हजार रुपये रोख रक्कम तसेच बाळासाहेब चामुटे यांचे घरातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागीने तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण7 तोळे सोन्याचे दागिने व 59 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरुन (Theft) नेला. या फिर्यादिवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) अनोळखी तीन इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 309(4) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे पुढील तपास करित आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...