Friday, May 3, 2024
Homeजळगावभरदिवसा पाच ठिकाणी घरफोडी

भरदिवसा पाच ठिकाणी घरफोडी

भुसावळ । Bhusawal । प्रतिनिधी

शहरातील तुकाराम नगर व पीयुष कॉलनी भागात चोरट्यांनी भरदुपारी पाच ठिकाणी घर फोडी करुन जवळपास 10 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार दि. 3 जुलै रोजी घडली. या घटनेमुळे चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हाण दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहिती नुसार शहरातील तुकराम नगर भागातील भरत विठ्ठल कोळी, गोपाळ रघुनाथ पाटील चंद्रशेखर सीताराम विश्वकर्मा,गणपत ठाकूर तर पीयुष कॉलनी भगातील अपार्ट मेंट मधील मनोज कोल्हे यांची घरे बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रविवारी भर दुपारी या पाच ही घरांवर निशाना साधला या घटनांमध्ये चोरख्यांनी घरातून सोने चांदीच्या दागिण्यांसह रोकड रकमेवर ही हाथ साफ केल्याचे सांगण्यात येत आहे.

पियुश कॉलनीतील घरफोडीत तब्बल दहा तोडे सोने. तर चंद्र शेखर विश्वकर्मा यांच्या घरातून अडीच ते तीन लाखांना ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समजते.

चोरटे हे चारचाकी वाहनाने आले असल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांचा आहे. शहरातील या शांत व कमी वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे.

शहरात भर दिवसात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. तसचे तालुक्यातील निंभोरा व वराडसीम भागात ही पशुधनाची चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. चोरटे पोलिसांनाच आव्हाण देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, घरफोडी संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुहा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या