Thursday, May 2, 2024
Homeजळगावसलग दुसर्‍या दिवशी त्याच अपार्टमेंटमध्ये चोरी

सलग दुसर्‍या दिवशी त्याच अपार्टमेंटमध्ये चोरी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील दौलत नगरातील (Daulat Nagar) शंकज अपार्टमेंटमधील (Shankaj Apartment) लिपीकाच्या घरात घरफोडी (burglary) झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, आज याच अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या रुख्मिणी ओंकार गोंधळी (वय-70) यांच्या घरातून चोरट्यांनी (thieves) चार तोळे सोने लांबविण्याचे (Four tolas of gold) शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरातील प्लॉट क्रमांक 5 मध्ये शंकज अपार्टमेंट आहे. याठिकाणी नूतन मराठा महाविद्यालयातील ज्युनिअर लिपीक रवींद्र भागवत घुगे (वय-45) हे चिंचोली येथे त्यांच्या मूळ गावी गेले असता, त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातून 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती.

याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर रुख्मिणी गोंधळी या वास्तव्याला आहेत. नवीन जोशी कॉलनीत राहणारे भाचे नीलेश जोशी यांच्याकडे राहत असून अधूनमधून त्या स्वत:च्या घरी जातात.

शेजारच्यांच्या लक्षात आली घटना

गोंधळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे शेजारी राहणार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती गोंधळी यांना कळविली. त्यांनी घरी येऊन पाहिले तर कपाट तुटलेले होते व त्यातील दागिने चोरी झाले होते.

कुलूप बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य

चोरट्यांकडून घरफोडी करण्यापुर्वी रेकी केली जाते. त्यानंतर दोन तीन दिवसांपासून कुलूप बंद असलेल्या घरात चोरटे डल्ला मारीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले असून अशीच घरे चोरट्यांचे लक्ष्य ठरु लागले आहे.

एकाच दिवशी केली चोरी

रविंद्र घुगे यांच्या घरी ज्या दिवशी चोरी झाली, त्याच दिवशी गोंधळी यांच्याकडे चोरी झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच या परिसरात गेल्या चार महिन्यातील ही पाचवी ते सहावी घरफोडी आहे.

मुलीसाठी बनविलेले दागिने लांबविले

रुख्मिणी गोंधळी यांनी आपल्या मुलीसाठी दागिने तयार केले होते. परंतु लग्नानंतर मुलीचे निधन झाले. त्यामुळे हे दागिने त्यांनी आपल्या घरातच ठेवले होते. परंतु चोरट्यांनी त्यांच्या घरातून ते दागिने देखील लांबवून नेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या