Thursday, March 13, 2025
Homeक्राईमबंद घराचे कुलूप तोडून 4 लाखांची चोरी

बंद घराचे कुलूप तोडून 4 लाखांची चोरी

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील गोगलगाव येथील रेवणनाथ मच्छिंद्र म्हस्के यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून आम्ही शेतामध्ये कांद्याची लागवड करण्यासाठी गेलो होतो. लागवडीचे काम संपवून काल दि. 1 जानेवारी रोजी घरी आलो असता, घराचे कुलूप तोडलेले आम्हाला दिसून आले. आम्ही घरात जावून पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. तेव्हा आम्ही कपाटात ठेवलेले दागिने व पैसे पाहिले असता, ते कपाटात दिसले नाही.

- Advertisement -

दोन सोन्याचे गंठण, एक डोरले असे पाच तोळ्याचे सोन्याचे तसेच पन्नास हजार रुपये रोख असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. कांदा लागवडीच्या कामानिमित्ताने दोन दिवस घर बंद राहिल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याव्यतिरिक्त आणखीही दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पाहणी केली असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंत माग दाखवला.

परिसरात सातत्याने छोट्या-मोठ्या चोर्‍यांच्या घटना घडत आहेत. सध्या चोर्‍यांच्या गुन्ह्याचे वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोगलगाव व सलाबतपूर परिसरात या अगोदरही अनेक चोरीचे गुन्हे घडले आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप तपास लावण्यात यश आले नाही. चोर्‍यांचे सत्र थांबवण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. नागरिकांमधील दहशत कमी होण्यासाठी पोलिसांना गुन्हेगारी मोडित काढावी लागणार आहे. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...