नवी दिल्ली | New Delhi
पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातून जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सराय बंजारा परिसरात धावत्या ट्रेनच्या चार डब्यांना आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये ट्रेनचे ४ डब्बे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड घाबरले. जीव मुठीत धरून हे प्रवासी घाबरून सैरावैरा पळू लागले. काही प्रवासांनी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. आग लागताच ट्रेन थांबवण्यात आली त्यानंतर प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
सराय वंजारा गावाजवळ ही घटना घडली. घटनास्थळावरील काही भीतीदायक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये दूरवर धुराचे लोट उठताना दिसत आहेत. तसेच घाबरलेले प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडून उभे असल्याचेही दिसत आहे.
शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरु; उपमुख्यमंत्री शिंदेंसह ‘या’ नेत्यांनी पवारांची घेतली भेट
धावत्या ट्रेनला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. सुरुवातीला अनेक प्रवासी आगीच्या विळख्यात सापडल्याची माहिती समोर आली होती. आग लागण्याचे नेमके कारण आणि या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासामध्ये सर्व संभाव्य बाबींची तपासणी केली जाणार आहे.
#WATCH | Rajpura, Punjab: Fire breaks out in 4 coaches of Karmabhumi Express in the Ambala division; no casualties reported
Northern Railway CPRO Himanshu Shekhar Upadhyay stated that the train stopped safely after its safety system was triggered near Sarai Banjara station. The fire is being brought under control; senior officials are on-site, and no injuries have been reported.— ANI (@ANI) November 6, 2026
कर्मभूमी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे थरारक व्हिडीओ आणि फोटो0 समोर आले आहेत. आगीच्या ज्वाला आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या. ही आग ट्रेनच्या पँट्रीमध्ये लागली त्यानंतर ती इतर डब्यांमध्ये पसरली अशी माहिती आहे. फायर अलार्म वाजल्यानंतर सर्वजण सावध झाले आणि ट्रेनमधून बाहेर पडले. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही.



