Sunday, January 25, 2026
HomeनगरShrirampur : अशोकनगर फाटा परिसरात आढळला जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Shrirampur : अशोकनगर फाटा परिसरात आढळला जळालेल्या अवस्थेत मृतदेह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरातील रेल्वे बोगदा 48 चौकीजवळ जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिक भुयारी पुलाजवळून ये-जा करत असताना भटके कुत्रे काही तरी तोडत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले. यानंतर नागरिकांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांना घटनेची माहिती दिली. यावरून पोलीस नाईक किरण टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

मृतदेहाजवळ संशयास्पद चप्पल आणि अंगावरील वस्त्र जळालेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहावर जळालेली अंडरवेअर वगळता एकही कपडा नाही. सदर व्यक्तीच्या गळ्याभोवती मोठी जखम आढळून आली आहे. त्यामुळे हत्या करुन पुराव नष्ट करण्यासाठी तो जाळला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेहाचा पंचनामा करुन तो साखर कामगार रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

YouTube video player

दरम्यान यासंदर्भात श्रीरामपूर येथील अमोल आबासाहेब पटारे (वय 34) रा. खिलारी वस्ती हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. स्थानिक व नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी घटनास्थळी येवून मृतदेह, चप्पल, वस्त्र व मोबाईलची पाहणी करुन सदरचा मृतदेह अमोल पटारे याचा असल्याची खात्री पटली. मयत अमोल पटारे उच्चशिक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

ताज्या बातम्या

Padma Awards 2026 List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील...

0
मुंबई | Mumbai केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे. यामध्ये लोकनाट्य जपण्यात दिलेल्या योगदानाबद्दल कलाकार रघुवीर...