Friday, May 3, 2024
Homeनगरबुरूडगाव रोडवर मनपा करणार एक कोटीचे म्युझिकल गार्डन

बुरूडगाव रोडवर मनपा करणार एक कोटीचे म्युझिकल गार्डन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथे खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरूस्तीवर खर्च न करता महापालिकेने (Municipal Corporation) आता एक कोटी सहा लाख रूपये खर्चाचे म्युझिकल गार्डन (Musical Garden) नगरकरांना देऊ केले आहे. महापालिका (Municipal Corporation) हद्दीतील प्रभाग 14 मधील म्हणजे राष्ट्रवादीचे उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) यांच्या प्रभागातील बुरूडगाव रोडवरील (Burudgav Road) मोकळ्या जागेतील साईनगर उद्यानात हे म्युझिकल गार्डन (Musical Garden) महापालिका उभारणार आहे. यासंदर्भातील निविदा आज मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत अंतिम होणार आहे.

- Advertisement -

घटस्थापना…नवरात्रोत्सवाला प्रारंभ

2021-22च्या नाविन्यपूर्ण योजनेतून व एक कोटी सहा लाख नऊ हजार 614 रूपये खर्चून साईनगर उद्यानात म्युझिकल गार्डन होणार आहे. ही नाविन्यपूर्ण योजना आमदार-खासदार निधीतून की जिल्हा वार्षिक नियोजन समितीतून होणार, तसेच या म्युझिकल गार्डनमध्ये संगीताच्या तालावरील कारंजे असणार की अन्य नेमके काय होणार, याची माहिती मनपाने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.

वांबोरीत कांद्याला तेजी

मात्र, या कामासाठी निविदा प्रसिद्ध होवून निविदा दरात म्हणजे एक कोटी सहा लाखातच हे म्युझिकल गार्डन उभारून देण्याची तयारी दाखवल्याने स्थायी समितीकडून त्यावर आता अंतिम मंजुरीचे शिक्कामोर्तब येत्या मंगळवारी होणार आहे.

गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाबाबत लवकरच बैठक

- Advertisment -

ताज्या बातम्या