Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रगुढीपाडव्याच्या दिवशीच भीषण अपघात! बस-बोलेरोची समोरासमोर धडक; दोन ठार, १५ जखमी

गुढीपाडव्याच्या दिवशीच भीषण अपघात! बस-बोलेरोची समोरासमोर धडक; दोन ठार, १५ जखमी

यवतमाळ | Yavalmal

देशात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील वाढते आहे. आज ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे…

- Advertisement -

एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू बोलोरोची समोरासमोर धडक झाली असून यात दोन तरुणी जागीच ठार झाल्या आहेत. तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना यवतमाळ दारव्हा मार्गावरील कामटवाडा गावाजवळ घडली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

एकदिवसीय विश्वचषकाबाबत महत्त्वाची अपडेट

पायल गणेश किरसान आणि पल्लवी विनोद भरडीकर असे मृत मुलींची नावे आहेत. तर पंधरा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारासाठी तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात ओशो आश्रमात राडा! अनुयायांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

- Advertisment -

ताज्या बातम्या