Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशतलावात बस कोसळून भीषण अपघात ; १७ जणांचा जागीच मृत्यू

तलावात बस कोसळून भीषण अपघात ; १७ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

बांगलादेशात बसला (Bangladesh Bus Accident) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बांगलादेशमधील झालाकाठी सदरमधील छत्रकांडा (Zalakathi Chatrakanda) भागात ही घटना घडली. याबाबत एएनआयने डेली स्टारच्या वृत्ताच्या हवाल्याने माहिती दिली आहे.

- Advertisement -

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही बस बशर स्मृती परिवहनची होती. या बसची क्षमता ५२ प्रवाशांची असताना देखील या बसमधून ६० प्रवासी प्रवास करत होते. ही बस शनिवारी सकाळी नऊ वाजता पिरोजपूरवरून भंडरियाकडे निघाली होती. त्यानंतर ही बस बरिशाल -खुलना राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा बस तळ्यात कोसळून हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येत आहे.

अजितदादांच्या गटात जयंत पाटील?

यावेळी, एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनूसार, अपघातात १७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील बहुतेक बळी पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी आहेत.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

दरम्यान, या बस अपघातातून बचावलेल्या एका प्रवासीने सांगितले की, “बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनेकजण बसमध्ये उभे होते. मी पाहिले तेव्हा बस चालवताना चालक वाहकाशी बोलत होता आणि अचानक बस रस्त्यावरून खाली गेली आणि तळ्यात पडली.” “बस तळ्यात पडल्यावर सर्व प्रवासी बसमध्ये अडकले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने तळ्यात पडल्यानंतर लगेचच बस बुडाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या