नवापूर Navapur । श.प्र.-
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात (Kondaibari Ghat) धुळ्याहून – सुरतकडे जाणार्या बस, ट्रेलर व ट्रकमध्ये (buses, trailers and trucks) भीषण अपघात (terrible accident) झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि.16 एप्रिल रेाजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावर कोंडाइबारी घाटात भरधाव वेगातील बस क्रमांक (एमएच 39-बीएल 3745) ने समोरुन येणार्या ट्रेलर (क्रमांक सीजी 94एमई 2848) व ट्रक (क्रमांक केएल 205 सी 7198) यांना धडक दिली. या भीषण अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत चालक जितेंद्रकुमार उमाशंकर सरोज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ अरुण कोकणी करीत आहेत.
जखमींमध्ये पुजा अशोक सोनार (24), अपुर्णा हेमंत जर्डे (14), दिपाली किशन जगताप (32), नैनीश किशन जगताप (6), भिमराव खंडेराव मोरे (88), चालक पोपट सोनू सरग, वाहक अतुल सुभाष पाटील यांचा समावेश आहे.
कोंडाईबारी घाटात नेहमीच अपघात होत असतात. मात्र, महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जाताना दिसून येत नाही. या महामार्गावर दिशादर्शक कुठलाही फलक नसल्याने अपघाताच्या सर्वात मोठे कारण आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु सात जण यात जखमी झाले आहेत. या जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.