Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी

Breaking News : प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी

संशयित आरोपी ताब्यात

- Advertisement -

विंचूर | वार्ताहर

YouTube video player

येथील मारवाडी पेठ परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. स्थानिक व्यापारी पवन नंदकुमार जाजू यांच्यावर मनोज बोराडे (रा. विंचूर) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास पवन जाजू हे आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी बोराडे तेथे आला. दोघांमध्ये काही वेळ वादावादी झाली आणि अचानक मनोज बोराडे याने चाकूने वार करून हल्ला केला. जखमी जाजू खाली कोसळले, तर आरोपी स्कुटीवरून घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जाजू यांना लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र हल्ल्यात आतड्याला गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, पवन जाजू आणि मनोज बोराडे हे दोघेही  टोमॅटो कॅरेट व्यवसायातील भागीदार होते. काही आर्थिक व्यवहारांवरून वाद सुरू असल्याचे समजते. याच वादातून हा हल्ला घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लासलगाव पोलिसांनी आरोपी मनोज बोराडे याला ताब्यात घेतले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....