Friday, May 3, 2024
Homeराजकीय..पण तसे होणार नाही, खडसेंनी केला 'हा' दावा

..पण तसे होणार नाही, खडसेंनी केला ‘हा’ दावा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र भाजपातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आपली मुलगी रोहिणी आणि अनेक समर्थकांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (President Sharad Pawar) आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत सामील झाले. या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून गेले. राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेण्यास सर्व प्रसारमाध्यमे उत्सुक होते. त्यात भारतीय जनता पक्षाला राज्यातले सरकार पडेल असे वाटत आहे मात्र तसे काहीही होणार नाही असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर ‘अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी पार्टीकडून सांगितले जात आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. मात्र, राज्य सरकार पडणार नाही.’ असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या