Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यासीए परीक्षेचा निकाल जाहीर

सीए परीक्षेचा निकाल जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाने (The Institute of Chartered Accountants of India) सनदी लेखापाल( Chartered Accountant) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत मुंबईच्या मीत शहाने( Meet Shah) 80.25 टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला असून दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल 12.59 टक्के लागला. तसेच नाशिकमधील साहिल समनानी ( Sahil Samnani )याने 72.88 टक्के गुण मिळवून देशात 15 वा क्रमांक प्राप्त केला.

- Advertisement -

आयसीएआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल 21.99 टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या 66 हजार 575 विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 643 उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल 21.94 टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या63 हजार 253 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 877 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या 29 हजार 348 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 695 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जयपूरच्या अक्षत गोयलने 79.88 टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने 76.38 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. या वेळी तपासणी पद्धतीमध्ये अधिक सुधारणा करून अत्यंत कमी कालावधीमध्ये अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजच्या काळात सनदी लेखापालांना मोठी मागणी निर्माण झाली आहे, असे आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.

सीए चा निकाल हा संपूर्ण नाशिककरांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. नाशिकमधून संपूर्ण भारतामध्ये रँक मिळवून विद्यार्थ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. मागील परीक्षेच्या तुलनेने निकाल हा वाढलेला आहे व तो नक्कीच सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे

-प्रा.सीए.लोकेश पारख

- Advertisment -

ताज्या बातम्या