Wednesday, December 4, 2024
Homeनगरचाळे सुरू असलेल्या तीन कॅफेवर छापे

चाळे सुरू असलेल्या तीन कॅफेवर छापे

तोफखाना पोलिसांची सावेडीत कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गाळ्यामध्ये प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या तीन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तीनही कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पंपिंग स्टेशन रस्ता, ताठे नगर येथे गोल्ड स्टार कॅफे, व्दारकाधीश कॉप्लेक्स, श्रीराम चौक येथे लव्ह बर्ड कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रस्ता येथे हंगरेला कॅफे याठिकाणी कॉफी शॉपचा बोर्ड लाऊन कुठलेही कॉफी अथवा खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता लाकडी कम्पार्टमेंट तयार करून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार तीनही ठिकाणी रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. कॉफीशॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना नव्हता. कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, गॅस किंवा इतर साहित्य नव्हते.

या ठिकाणी अश्लील चाळे करण्यासाठी आडोशासाठी लावण्यात आलेले पडदे तात्काळ काढून टाकण्यात आले. मुला-मुलींना तोंडी समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी गोल्ड स्टार कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (वय 23, रा. ताठेनगर, सावेडी), लव्ह बर्ड कॅफेचा चालक ऋषीकेश सखाराम निर्मळ (वय 24, रा. श्रध्दा हॉटेल शेजारी) हंगरेला कॅफेचा चालक ओमकार दत्तात्रय कोठुळे (वय 25, रा. भूतकरवाडी चौक) यांच्याविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या