येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील देवळाणे येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या अॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांचेवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
देवळाणे येथील बोराडे वस्तीवर शेतकरी भाऊसाहेब बोराडे व त्यांच्या पत्नी कांता बोराडे घराच्या टेरेसवर झोपलेले होते. अज्ञाताने त्यांच्यावर अॅसिड फेकले. यात बोराडे दांपत्य गंभीर जखमी झाले. सदर घटना शुक्रवारी, (दि. ८) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या संदर्भात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब तज्ञांनी भेट दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रुग्णालयात जखमी बोराडे पती पत्नीची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक उपस्थित होते.





