Wednesday, June 10, 2026
HomeUncategorizedमुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात; सर्वजण सुखरूप

मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात; सर्वजण सुखरूप

मुंबई |

खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून माहिती देत नागरिकांना रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वाचे आवाहन केले. पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 असलेल्या कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याचे त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

अपघातानंतर त्यांनी म्हटले की, महामार्गांवरील अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालना ही गंभीर समस्या बनत आहे. अशा घटनांमुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक मंदावली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...