नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २१ वर्षीय भारतीय युवक जसनप्रीत सिंगला या अपघातासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण दारूच्या नशेत ट्रक चालवत होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तरूणाला तात्काळ अटक केली आहे.
अपघात कसा घडला?
सॅन बर्नार्डिनो काउंटी फ्रीवेवर जसनप्रीत सिंगचा सेमी-ट्रक हळू चालणाऱ्या वाहनांना धडकला तेव्हा हा अपघात झाला. ट्रकच्या डॅशकॅमने अपघाताची घटना टिपली, ज्यामध्ये ट्रक एका एसयूव्हीला धडकताना दिसत आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे.
पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, जसप्रीतने अपघाताच्यावेळी ब्रेक दाबले नव्हते. हा तरुण ड्रग्जच्या नशेत वाहन चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल अधिकारी रॉड्रिगो जिमेनेझ यांनी सांगितले.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) खात्री केली आहे की जसनप्रीत सिंगकडे अमेरिकेत वैध स्थलांतर दर्जा नाही. त्याने २०२२ मध्ये दक्षिणेकडील सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे आणि “अटकेच्या पर्याय” धोरणाअंतर्गत त्याला देशात सोडण्यात आले. त्याच्या अटकेनंतर, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन डिटेनर जारी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




