Monday, July 22, 2024
Homeनाशिकपोलीस शिपाई लेखी परिक्षेसाठी उमेदवारांची दांडी

पोलीस शिपाई लेखी परिक्षेसाठी उमेदवारांची दांडी

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

- Advertisement -

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या (Nashik Rural Police Force) भरती प्रक्रियेचा (Recruitment process) अंतिम टप्पा सुरू झाला असून पोलीस शिपाई पदाच्या (Police constable post) 164 जागांसाठी पात्र ठरलेल्या

एकूण 1879 उमेदवारांची लेखी परीक्षा (Written Examination) आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षेत 1032 उमेदवारच हजर होते तर 837 उमेदवारांनी दांडी मारली. दरम्यान आजच राज्यभरात एकच वेळी परीक्षा आल्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवार नाशिकला पोहचू शकले नाही असे समजते.

ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (police constable) यांच्या १६४ रिक्त जागांसाठी दि. ४ ते २० जानेवारी दरम्यान मैदाणी चाचणी घेण्यात आली होती. त्यातील उतीर्ण झालेल्या उमेदवारांची १८ फेब्रुवारी रोजी यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

महाआयटी (Maha IT) मार्फत ई-मेल व एस.एम.एस द्वारे आज होणाऱ्या परीक्षेच्या सुचना पारित करण्यात आल्या होत्या. गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालय सकाळी परीक्षा सुरळीत पार पडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या