Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

जिंकल्या तब्बल 'इतक्या' जागा

नवी दिल्ली | New Delhi

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपप्रणित एनडीएला (NDA) इंडिया आघाडीने कडवी झुंज दिल्यानंतर आता इंडिया आघाडीने (India Aaghadi) सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत एनडीएला चांगलीच लढत दिली आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी १३ पैकी ११ ठिकाणी विजय मिळविला आहे. तर भाजपाला (BJP) केवळ १ जागा जिंकता आली असून, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

YouTube video player

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी (दि.१० जुलै) रोजी मतदान प्रक्रिया (By Poll Election Result) पार पडली होती.विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. यात बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्यप्रदेशातील अमरवारा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या जागांचा समावेश होता.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

दरम्यान, यातील पश्चिम बंगालमधील (West Bengal) चारही जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. तर उत्तराखंडमधील आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन व मध्यप्रदेशमधील एका जागेवर काँग्रेसचा (Congress) उमेदवार विजयी झाला आहे. तसेच हिमाचलमधील एका जागेवर भाजपाच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. याशिवाय तामिळनाडूतील एका जागेवर डीएमके, तर पंजाबमधील जालंधर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा (AAP) उमेदवार विजयी झाला आहे. तसेच बिहारमधील एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...