Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्र"आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…"; संजय राऊतांचा गंभीर...

“आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

काल झालेल्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) महायुतीचे (Mahayuti) ९ तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) २ उमेदवार विजयी झाले आहेत.या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Accident News : नाशिकमध्ये आयशर ट्रक आणि कारचा भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू

तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) पाठिंबा दिलेल्या शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांची फाटाफूट आणि घोडेबाज झाल्याचा आरोप करत आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव मिळाल्याचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १३ जुलै २०२४ – भूतां परस्परे जडो…

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, आम्हाला कोणताही पराभवाचा धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही आमदार फुटलेले नाही. काँग्रेसचे ते ७ जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते. फुटीर आमदारांना काल शेअर मार्केटसारखा भाव होता. काहींना २५ कोटी रुपये वाटले. तर काही आमदारांना प्रत्येकी २ एकर जमिनी देखील वाटल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हें देखील वाचा : नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान

तसेच शिवसेनेकडे (ठाकरे गट) केवळ १५ मते असतानाही आमचे उमेदवार मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील सुद्धा निवडून आले असते, पण गणित जुळले नाही. आम्ही सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. शरद पवार यांनीही जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केले. ते आमच्या महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...