Friday, August 21, 2026
Homeनाशिकडॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च

कोलकाता येथील घटनेचा केला निषेध

नाशिक | मयूर जाधव

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्ययुर कीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमबीबीएसच्या पदवी आणि पदव्युत्तर तसेच फिजिओथेरपी या विद्या शाखांतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून कॅन्डल मार्च काढत कोलकाता येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल महाविद्यालयात घडलेल्या संतापजनक घटनेतील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी, या मागणीसाठी नाशिकमध्ये हा कॅण्डल मार्च काढण्यात आला.

अत्यंत गंभीर गुन्हा घडूनही तपासकार्य पुरेशा गंभीरपणे होत नाहीये, पुरावे नष्ट केले जात आहेत, असा आरोप करीत मोर्चेकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या लाजिरवाण्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी विविध घोषणांचे फलक हाती घेत दोषींवर कडक शासन करावे, अशी मागणी केली. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...