Sunday, September 6, 2026
HomeनाशिकNashik Crime News : रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या कामगारांचे बंदुकीच्या धाकावर 'फिल्मी...

Nashik Crime News : रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या कामगारांचे बंदुकीच्या धाकावर ‘फिल्मी स्टाईल’ अपहरण; एका संशयिताला बेड्या

ओझे | वार्ताहर | Oze

- Advertisement -

तळेगाव शिवारात (Talegaon Area) ‘डी. जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बंदूकधारी गुंडांनी दहशत माजवत सुरक्षारक्षक आणि ऑपरेटरचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयितांनी (Suspected) काम बंद करण्याची धमकी देत, ‘तुमच्या मालकाला आमचे पैसे द्यायला सांगा, नाहीतर तुम्हांला मारून टाकू’ असा दम भरला. एवढेच नव्हे तर, या दोघांना चालत्या वाहनातून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक प्रकाराबाबत कंपनीचे इंजिनिअर उदयराज भारत विखे (रा. नारायणगाव, जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी बाजीराव बाळू साठे (रा. विंचूर गवळी, आडगाव, नाशिक) व गणेश अशोक शिंदे (रा. श्रीरामनगर, आडगाव, नाशिक) हे दोघे एका सफेद रंगाच्या विनाक्रमांकाच्या गाडीने तळेगाव शिवारातील हॉटेल शिवनईच्या मागे असलेल्या बेल्हेकर कंपनीच्या पत्र्याच्या शेडजवळ आले. तिथे काम करत असलेले मजूर (Labor) सुबोध लट्टू पासवान व सुमनकुमार जोगी पासवान यांना “तुम्ही रस्त्याचे काम करू नका” असे म्हणून त्यांनी दमदाटी करत मारहाण सुरू केली.

त्यानंतर मजुरांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून “येथून निघून जा, हे सर्व आमच्या मालकीचे आहे. येथे थांबलात तर तुमचा बेत पाहू,” अशी धमकी दिली. या गुंडांचा हैदोस एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी तेथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक गोरेलाल रामदेव चौरसीया व ऑपरेटर रविशंकर द्विवेदी यांना थेट बंदुकीचा धाक दाखवला. दोघांना जबरीने ओढत विनाक्रमांकाच्या चारचाकी गाडीत बसवून त्यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण (Kidnaping) केले.

खंडणीसाठी चालत्या वाहनातून ढकलले!

संशयित आरोपी या दोघांना गाडीत टाकून तळेगाव येथील पुलावर घेऊन गेले. “तुम्हारे मालिक को हमारे पैसे देने बोलो, नही तो तुमको अभी मार डालेंगे,” अशी खंडणीची भाषा वापरत धमकी दिली. तसेच रहदारीच्या रस्त्यावर या दोघांचा जीव जाऊ शकतो हे माहीत असतानाही, त्यांना चालत्या वाहनातून खाली ढकलून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलीस ॲक्शन मोडमध्ये; एका संशयिताला बेड्या

या घटनेनंतर डी. जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचे इंजिनिअर उदयराज विखे यांनी तातडीने दिंडोरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित बाजीराव साठे व गणेश शिंदे यांच्या विरोधात अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य संशयित बाजीराव बाळू साठे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, दुसरा आरोपी गणेश शिंदे याचा शोध सुरू आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...