अंबासन | वार्ताहर Ambasan
- Advertisement -
जायखेडा पोलिसांनी नामपूर येथे केलेल्या धडक कारवाईत ३२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नामपूर चारफाटा येथील रहिवाशी संजय आबाराव गायकवाड यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारून १६०० ग्रॅम वजनाचा सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. गायकवाड याने विक्रीच्या उद्देशाने गांजा आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्लास्टिक टेपने गुंडाळलेल्या पिशवीत मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.




