Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली; ३ ठार, ३ गंभीर जखमी

ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली; ३ ठार, ३ गंभीर जखमी

मुंबई | Mumbai

माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कार २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्व युवक हे वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण कोकण दर्शनासाठी गेले होते. कोकण पर्यटण करुन परतताना ताम्हिणी घाटात त्यांच्या कारला अपघात झाला. या कारचा अक्षरश: चुराडा झाला.

ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या