Friday, January 23, 2026
HomeनगरAccident News : निवडुंगे शिवारातील अपघातात सासरा-सुनेचा मृत्यू

Accident News : निवडुंगे शिवारातील अपघातात सासरा-सुनेचा मृत्यू

दोन चिमुरड्या गंभीर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील निवडुंगे शिवारात मंगळवारी (दि.14) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत कार शेतात पलटली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

अपघातात आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय 70) आणि त्यांची सून किरण बाळासाहेब निकाळजे (वय 38, रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय 12) आणि स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय 6) या दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बाळासाहेब आसाराम निकाळजे (वय 40) अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या एका पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुन्हा तपासणी करण्यासाठी बाळासाहेब यांना घेऊन कुंटूंबिय मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ओमीनी कारने पुण्याकडे निघाले होते. मात्र, निवडुंगे गाव सोडल्यानंतर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांच्या ओमीनी कारला समोरून जोराची धडक दिली.

धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडली. या भीषण धडकेत कारमधील आसाराम निकाळजे आणि किरण निकाळजे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. मात्र, कारचालक व बाळासाहेब निकाळजे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

अपघातानंतर तिसगाव येथील 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव धोत्रे करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...