Tuesday, March 25, 2025
Homeनगरकार-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

कार-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दोघे जखमी || बाभुळगाव शिवारातील घटना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माळी बाभुळगाव शिवारामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन युवकाचा मृत्यू झाला तर दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. किरण लक्ष्मण धोत्रे (वय 20, रा. नाथनगर) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अजय पिराजी पवार (वय 21, रा. शिक्षक कॉलनी) व सतीश उर्फ अन्नू बाबुराव पवार (वय 22, रा. नाथनगर, पाथर्डी) हे दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळी बाभुळगाव शिवारातील पाथर्डी-अहिल्यानगर रस्त्यावर हॉटेल प्रेम नजीक पाथर्डीवरून अहिल्यानगरकडे जाणार्‍या कारने पाथर्डीकडे येणार्‍या दुचाकीला धडक दिली.

- Advertisement -

गुरूवारी रात्री साडे 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे पुढील बंपर ठोकून दुचाकीचे पुढील चाक कारच्या ड्रायव्हर साईटच्या चाकामध्ये जाऊन गुतले. यात किरण धोत्रे हा मयत झाला. अपघातानंतर प्रथम या सर्व जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र यातील किरण धोत्रे याचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. सतीश पवार व अजय पवार हे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस अंमलदार सोमनाथ बांगर, सुहास गायकवाड, संदीप बडे, दुर्योधन म्हस्के, राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले. पुढील तपास पोलीस अंमलदार अल्ताफ शेख करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...