Friday, May 3, 2024
Homeजळगावइगतपुरीजवळ अपघात : चाळीसगावातील एक ठार, चार गंभीर

इगतपुरीजवळ अपघात : चाळीसगावातील एक ठार, चार गंभीर

इगतपूरी/चाळीसगाव । प्रतिनिधी Igatpuri /Chalisgaon

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्याजवळ मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका टेम्पोला स्विफ्टने मागून जोरदार धडक दिली.

- Advertisement -

यात स्विफ्ट मधील १ जण जागीच ठार झाला तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहे. दोनच दिवसांपुर्वी याच ठिकाणी अपघातात एकाचा मृत्यु झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे पिंप्रीसदो हा मृत्युचा फाटा अशी भीती प्रवासी वर्गात झाली आहे.

इगतपुरी शहराजवळील पिंप्रीसदो फाट्या जवळ मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास टेम्पो क्रमांक ( MH 04- Ck 5089 हा नाशिककडे जात असताना स्विफ्ट डिझायरने ( MH04 fj 4905) मागून जोरदार धडक दिली.

यात स्विफ्ट डिझायर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आशिष रवींद्र भावसार, वय, 22 राहणार, चाळीसगाव हा तरुण जागीच ठार झाला आहे.

तर अक्षय जाधव, निकेत रणदिवे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, दीपक गायकवाड, अक्षय दामोद, राहणार चाळीसगाव हे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश वराडे, ईश्वर गंगावणे, भाबड आदी करत आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्यावर गेल्या पाच सहा वर्षात शेकडो प्रवाशांचे अपघातात बळी गेले. उड्डाणपुल तयार करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या चार-पाच वर्षापासुन अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी मोर्च आंदोलने छेडली. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहे. पिंप्रीसदो फाटयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे भावली धरण असल्याने मुंबईच्या अनेकांनी चढया भावात जमीनी खरेदी केल्याने उड्डानपुल झाल्यास त्यांचे दर उतरु नये म्हणून संबंधित अधिकाऱ्याना हाताशी धरले जात असल्याची परिसरात चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या