Sunday, April 27, 2025
HomeनगरAccident News : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कारची टँकरला धडक; एक ठार,...

Accident News : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कारची टँकरला धडक; एक ठार, तिघे जखमी

पारनेर । तालुका प्रतिनिधी

कार व टॅकरच्या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. अहिल्यानगर -पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात हा भीषण अपघात झाला. कार आणि टॅंकरची धडक इतकी भीषण होती की, कारमधील १ जण जागीच ठार झाला तर तिघे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही घडली घडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर पुणे महामार्गावरुन कार (क्र.MH 12 AN 6092) ही गाडी घेऊन कार चालक मयत शामराव राजु कदम (रा. कारेगाव पुणे ) हे दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अहिल्यानगरहुन पुण्याच्या दिशेने जात असताना सुपा वांघुडें शिवारात रस्त्याच्या बाजुला उभा लिक्विड सिंमेटच्या टँकरला (क्र MH 14 LL 9777) पाठीमागून धडकले. या धडकेत कारचालक शामराव कदम जागीच मृत्यू पावले तर त्याची पत्नी व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...