Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकारची रसाच्या गुर्‍हाळाला धडक; रसविक्रेत्याचा मृत्यू

कारची रसाच्या गुर्‍हाळाला धडक; रसविक्रेत्याचा मृत्यू

भगूर | वार्ताहर Bhagur

- Advertisement -

देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर भरधाव कारने ऊसाच्या रसाच्या गुर्‍हाळाला दिलेल्या जोरदार धडकेत गुर्‍हाळ चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मच्छिंद्र आबाराव रोडगे (वय ६७) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगूरहून देवळाली कॅम्पच्या दिशेने वेगाने जाणार्‍या ब्रेझा (एमएच १५ जेके ६७१८) कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट भगूर-कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऊसाच्या रसाच्या गुर्‍हाळावर जाऊन आदळली.अपघात इतका भीषण होता की, गुर्‍हाळाचे मशीन, लाकडी गाडी आणि इतर साहित्याचे तुकडे उडाले. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मच्छिंद्र रोडगे यांना त्यांचा मुलगा संतोष यांनी तातडीने कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. अविनाश बोरसे यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी वाहन चालक तुकाराम वाजे राहणार पांढुर्ली याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ओपन बार’ आणि रात्रीचा गोंधळ; आदेशांची काही...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि बदलती जीवनशैली यासोबतच रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ('ओपन बार') करण्याचे प्रमाण...