Friday, May 3, 2024
Homeनाशिकसीसीटिव्ही बसवला म्हणून कार पेटवली

सीसीटिव्ही बसवला म्हणून कार पेटवली

नाशिक । Nashik

बिल्डींगच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरा बसवल्याच्या रागातून एकाने चारचाकी पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी पहाटे पंचक जेलरोड परिसरात घडली.

- Advertisement -

कैलास गुरव (रा. राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयाजवळ, शिवरोड, पंचक जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संतोष काशीनाथ नागरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित हे नागरे यांच्या शेजारी राहयला आहेत.

नागरे यांनी इमारतीत सीसीटिव्ही बसवल्याचा राग मनात असल्याने गुरव यांनी शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नागरे यांच्या भाच्याची स्विफ्ट कारवर (क्र. एमएच १, व्ही.ए. ०४६२)ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरिक्षक पी.डी. माळी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या