Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदगाव : हिसवळ येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेली

नांदगाव : हिसवळ येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेली

नांदगाव | Nandgaon

काल सायंकाळी व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिसवळ खुर्दच्या पुलावरून वाहत असलेल्या पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याची घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान घटनास्थळा पासून २०० मीटर अंतरावर एका झाडाला कार अडकली होती. कारमध्ये असलेल्या दोघांपैकी बापू आहेर नावाचा तरुण वाचला तर दुसऱ्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.

यासंदर्भात गावकऱ्यांनी संबंधित चालकाला पुलावर जास्त पाणी आहे, याबाबत सूचना केली होती. परंतु न ऐकता कार पुराच्या पाण्यातून नेण्याचे धाडस केले ते त्याच्या अंगी आले.

सदर घटनेचा तपास पोलिस करीत असून या युवकास शोधण्यासाठी नागरिक मदत करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या