Thursday, May 2, 2024
Homeशैक्षणिकआव्हानात्मक करिअरवाट !

आव्हानात्मक करिअरवाट !

आजच्या काळात लहानात लहान आणि बड्याबड्या कंपन्या आपल्या प्रॉडक्टचे जोरदार ब्रॅडिंग करत आहेत. ग्राहकांपर्यंत आपला ब्रँड पोचवण्यासाठी सध्या जोरदार कॅम्पेन आणि व्यवस्थापनाची आखणी केली जात आहे. यासाठी असणारी ब्रँड मॅनेजमेंट टीम मोलाची भूमिका बजावते. किरकोळ आणि ठोक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड मॅनेजमेंटचे नियोजन कंपनीला फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. लक्झरी ब्रँड मॅनेजमेंटमध्ये कल्पकता, समयसूचकता या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण यावर उत्पादनाचे यशापयश अवलंबून असते.

ब्रँड मॅनेजमेंट हे आव्हानात्मक करियर मानले जाते. यात रोजगाराची कमतरता नाही. जर आपल्याकडे अंगभूत कौशल्य असतील तर लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट आपल्यासाठी चांगले करियर म्हणून सिद्ध होऊ शकते. भारतात गेल्या काही वर्षांपासून लक्झरी मार्केट विकसित होत आहे, ते पाहता या क्षेत्रात प्रशिक्षित रिटेल आणि सर्व्हिसमध्ये व्यावसायिकांना चांगली संधी मिळत आहे. आजचा काळ
म्हणजे ‘जो दिखता है, वह बिकता है’, असा आहे. अशा स्थितीत लहान-मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनाची जोरदार ब्रॅडिंग करत आहेत आणि ते काम पूर्णपणे तडीस
नेत आहेत. यासाठी ब्रँड मॅनेजमेंट टीम ही महत्त्वाचे काम करते. ब्रॅडिंगचा वाढता वापर आणि ब्रँड मॅनेजमेंट हे युवकांसाठी चांगले करियर म्हणून समोर येत आहे. यापैकीच एक पीजी डिप्लोमा इन लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट अभ्यासक्रम ओळखला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला करियरचे मार्ग मोकळे होतात.

- Advertisement -

अभ्यासक्रमाची माहिती : पीजी डिप्लोमा इन लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट हा १६ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमादरम्यान दहा महिने ॲकेडेमिक सेशन असते. यात ॲकडेमिक्सबरोबरच जॉब ट्रेनिंगसुद्धा दिली जाते. ॲकडेमिक सेशननंतर विद्यार्थ्यांना सहा महिने उद्योगात इंटरशिप करावी लागते.

पात्रता काय : या अभ्यासक्रमात ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थिनींना पदवी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लक्झरी आणि मॅनेजमेंटमध्ये आवड असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी संवाद देहबोली चांगली असणे अत्यावश्यक आहे. तसेच इंग्रजीवर प्रभुत्व असावे लागते. या आधारावर या क्षेत्रात कोणताही उमेदवार चांगले करियर करू शकतो. याशिवाय एखादी परकी भाषा अवगत असल्यास करियरला बूम मिळू शकतो.

संधी कोठे मिळणार : पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी लक्झरी सेल्स ॲडव्हायजर, व्हिज्यूअल मर्केडायजर, लक्झरी इव्हेंट प्लॅनर, ब्रँड हेड, ब्रँड मॅनेजर होऊ शकतो. फॅशन आणि लक्झरी कन्सल्टंट किंवा वॉर्डरोब मॅनेजर म्हणून देखील काम करू शकतो.

साचेबद्ध करियरपेक्षा वेगळे : रिटेलमध्ये लक्झरी सेक्टर २० टक्के वार्षिक दराने वाढत आहे. ही तेजी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. २०२० पर्यंत या क्षेत्रात आतापर्यंत २८ लाख नागरिकांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑटोमोबाइल्स, ज्वेलर्स, घड्याळ, रिअल इस्टेट, वाईन, ट्रॅव्हल अँड टूरिझममध्ये नवीन संधी ही रोजगार निर्मितीला पूरक ठरू शकते. मात्र अजुनही या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. या क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने काम करणाऱ्या मनुष्यबळाची गरज भासत नाही. इथे नाविण्यपूर्ण काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

तज्ञ काय म्हणतात : पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन लक्झरी ब्रँड मॅनजमेंट हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. रिटेलची गरज सध्या वाढत चालली आहे. मात्र यात कुशल उमेदवारांचा अभाव आहे. या क्षेत्रात रोजगाराची विपूल संधी आहे. सध्याची जगातील स्थिती पाहता भविष्यात या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्यांना अनोखे करियर करायचे असेल, त्यांना या क्षेत्रात वाव आहे.

वेतनमान : या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला इंटरशिपसाठी पाठवले जाते. त्यात स्टायफंंड म्हणून १५ ते २५ हजार रुपये मिळतात. अभ्यासक्रम पूर्ण करताच आपल्याला नोकरीच्या सुरवातीला ४० ते ५० हजार वेतन मिळते. अनुभवाच्या आधारावर वेतनात वाढ होत जाते.

प्रमुख संस्था

१.इंडियन रिटेल स्कूल, नवी दिल्ली
२.लक्झरी कनेक्ट बिझनेस स्कूल, गुडगाव
३.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडिज, मुंबई
४.सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, पुणे
५.झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अँड इंटरप्रेन्योरशिप, बंगळूर

- Advertisment -

ताज्या बातम्या